०६ जानेवारी पत्रकार दिन विशेष पत्रकारांना समाजात महत्वाचे स्थान- प्रा.धनंजय कदम



महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. देशपातळीवर तो १७ नोव्हेंबर तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तो ०२ नोव्हेंबरला साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार होते. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.वृत्तपत्राची

संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला

सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.

1834 साली भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि 1845 साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत.

पत्रकारांना समाजात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे त्यांचे मुख्य कारण म्हणजे जे समाजात घडत आहे त्याचे सखोल विचार मंथन करून ते आपल्या समोर वर्तमान पत्राद्वारे मांडत असतात सखोल निःपक्ष पणे सत्य आपल्या समोर निर्भिडपणे मांडताना दिसतात. समजाच्या कानाकोपऱ्यात घडणारे प्रसंग ते आपल्या लेखनातून मांडत असतात. पत्रकारांवर विविध प्रकारचा दबाव आहे. अब्रूनुकसानीचा दावा ठोकून पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार केला जातो. राजकीय पक्षांच्या विरोधात केलेल्या बातम्यांची नोंद घेतली जाते. तुम्ही आमच्या पक्षाविरोधात बातमी दिलीत तर तुमच्या पेपरला दिल्या जाणाऱ्या जाहिराती कमी करून टाकू अशा पद्धतीने आर्थिक नाड्या आवळल्या जातात असे अनेक प्रसंग घडताना दिसतात. आज आपणास असे पाहायला मिळते की हीच पत्रकारिता काळानुसार बदलत जाताना ही पाहायला मिळते. आता परिस्थिती बदलली आहे पूर्वी काल काय घडले ते आज माहिती मिळायची पत्रकार फील्ड वर जाऊन माहिती गोळा करायचे आणि नंतर ती दुसऱ्या दिवशी अंकात प्रकाशित केली जायची आणि नंतर ती आपण समोर वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत जायची,नंतर च्या काळात बदल होऊन दूरचित्राहिन्यांवर ती बातमी संध्यकाळ पर्यंत मिळू लागली आणि आता तर ती काही वेळेतच सोशल मीडियाचा वापर करून काही मिनिटात ती आपल्या समोर येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. आशा प्रकारच्या बदल होताना दिसतात. आज पत्रकार बंधूचे अनेक समस्या समोर असतात त्यांना मिळणारे वेतन, सुट्ट्या, कामाच्या ठिकाणी जर उत्तम दर्जा असणाऱ्या सुविधा असतील तर पत्रकार सर्वोत्तम काम ते करताना पाहायला मिळू शकतात. पत्रकार बंधू वर वेगवेळ्या प्रकार आरोप होतात अशा अनुभवांना सामोरे जावे लागतात.

आज आपण पत्रकार दिन साजरा करत असताना पत्रकार बंधू भगिनींना समाजातील ज्वलंत प्रश्न, समस्या निःपक्ष पणे मांडण्याचे सामर्थ्य मिळाले पाहिजे आणि त्याचं बरोबर या निमित्ताने त्यांचे समोर असणाऱ्या समस्या मधून ही त्यांची सुटका व्हावी ही ईश्र्वर चरणी प्रार्थना. आपणा सर्वांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget