वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Mohite Patil ) यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil ) यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे.
मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी 'एकच वादा धवल दादा' अशा घोषणा देऊन समर्थकांनी सभागृह दणाणून सोडला होता. धवलसिंह यांच्या हजारो समर्थकांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मोहिते पाटील आणि काँग्रेस हे जुने नाते आहे. माझे वडिलांनी राजकारणाची सुरुवात ही काँग्रेस पक्षाकडून केली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली गेली आहे. राजकारण चांगले वाईट दिवस आले. पण काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा असून काम करण्याची नव्याने मला संधी मिळाली आहे, असं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.
'काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवत धवलसिंह मोहिते याचा प्रवेश झाला आहे. काँग्रेस संपवण्याचे प्रयत्न केले पण काँग्रेस संपत नाही. धवलसिंह मोहिते नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत तर्क लावले जात होते. काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवला. त्यामुळे धवलसिंह यांच्या येण्यामुळे काँग्रेसची ताकद सोलापूर जिल्ह्यात वाढेल. बिबट्याला धवलसिंह यांनी टिपले आता भाजपला ही टिपतील', असा विश्वास धीरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.