सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीनुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या विविध फ्रंटल सेल च्या पदाधिकाऱ्यांची निवड केली. काँग्रेस भवन सोलापूर येथे नूतन पदाधिकाऱ्यांचे निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्या क्रीड़ा सेलच्या अध्यक्षपदी भरत किसन मेकाले व उपाध्यक्ष पदी वासुदेव पुरुषोत्तम दोरनाल यांची निवड
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी विकास रणशिंगे व गोपीचंद शंकरराव मुदगल यांची निवड
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी चौबल विठ्ठल मनसावाले यांची निवड
सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या माहिती तंत्रज्ञान (IT) सेलच्या अध्यक्षपदी कुणाल कमलाकर घोडके व उपाध्यक्षपदी याकुब म. हनीफ मंगलगिरी यांची निवड
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या सुशिक्षित बेरोजगार सेल च्या अध्यक्षपदी रूपेश रविंद्र गायकवाड़ यांची निवड
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या शहर मध्य विधानसभा विधी सेल च्या अध्यक्षपदी एड अजय यल्ला यांची निवड करण्यात आली.
या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे निवडीचे पत्र काँग्रेस भवन सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी माजी खासदार, माजी आमदार, आजी माजी नगरसेवक, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी, प्रवक्ते, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.