बारामती सहा जणांविरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

व्याजाने घेतलेल्या पैशापोटी जमीन लाटणाऱ्या आणि त्यानंतरही त्रास देणाऱ्या सहा सावकारांविरोधात बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महादेव बिटू सांगळे, आशा महादेव सांगळे, मल्लेश कदरापूरकर (तिघेही रा. पिंपरी, पुणे), बिभिषण ढोले, भास्कर काशिनाथ वणवे, दत्तात्रय राजाराम वणवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नामदेव रामचंद्र ढोले (वय ५०, रा. लाकडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. 



नामदेव रामचंद्र ढोले यांची आई २०१६ साली आजारी होती. त्यावेळी जळोची येथील सांगळे यांच्याकडून त्यांनी १ लाख रुपये दरमहा १० टक्के व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात लाकडी येथील गट नं. ९५ मधील एक एकर जमीन नामदेव यांचे भाऊ अशोक रामचंद्र ढोले यांनी सांगळे यांना लिहून दिली होती. हा दस्त बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात झाला. १ लाख रुपयांच्या बदल्यात ३ लाख ६५ हजार रुपये व्याज सांगळे यांच्याकडून लावण्यात आले. त्या बदल्यात अशोक ढोले यांच्या नावे असलेली दीड एकर जमीन आशा सांगळे यांच्या नावे करून घेण्यात आली. २०१६ ते २०१८ या कालावधीत बिटू सांगळे यांना नामदेव ढोले यांनी ३२ लाख रुपये व्याज व मुद्दलीच्या बदल्यात देण्यात आले.



तरीही त्याच्यांकडून आणखी पैशाचा तगादा सुरुच होता. तो भागविण्यासाठी सांगळे याच्याच मध्यस्थीने बिभीषण जमसिंग ढोले यांच्या साथीने जमीन गट क्र. ९४ मधील दोन एकर जमीन पिंपरीतील सावकर मल्लेश बसलिंगप्पा कदरापूरकर यांना गहाण ठेवून त्यांच्याकडून ५ लाख ८५ हजार रुपये नामदेव ढोले यांनी सांगळे बँक खात्यामार्फत २७ ऑगस्ट २०१८ रोजी घेतले. सरकारी मूल्यानुसार तेवढ्याच किंमतीचा कागद करत उरलेली ५ लाख १५ हजारांची रक्कम कदरापूर याने नामदेव ढोले यांना व्याजाने देत खरेदी दस्त करून घेतले. कदरापूरकर यांच्याकडून पैसे आल्याने सांगळे यांनी लिहून घेतलेले खरेदी दस्त पलटून देण्यासाठी नामदेव ढोले हे सांगळे यांच्याकडे गेले. त्यावेळी सांगळे याने दस्त पलटून देण्यास नकार दिला. त्यामुळे कदरापूर यांच्याकडून घेतलेल्या रकमेला व्याज देण्याची वेळ नामदेव ढोलेंवर आली. कदरापूर यांनीही फिर्यादीकडून १० लाखांच्या बदल्यात २२ लाख वसूल केले. ही रक्कम देण्यासाठी नामदेव ढोले यांची ६.५ एकर शेतजमीन रायचंद पांडूरंग वणवे व त्यांचा भाऊ यांना विकण्यात आली. हा व्यवहार ३६ लाख ९० हजार रुपयांना झाला. त्यातील २२ लाख रुपये सांगळे याने घेतले. तर १४ लाख ९० हजार रुपये कदरापूरकर यांनी घेतले. त्यानंतरही सांगळे याने दोन तर कदरापूरकर याने २० लाखांच्या व्याजाची मागणी करत ही रक्कम दिली तरच जमीन परत करू, अशी धमकी दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget