सोलापूर // प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसने शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवल पेट्रोल पंप समोर सोलापूर येथे अनोखे प्रतीकात्मक "भैस के आगे बिन बजाना आंदोलन" रेड्यासमोर पुंगी वाजवून जनतेच्या अडचणीशी काही देणेघेणे नसलेल्या मुक़्या, बहिऱ्या, आंधळ्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारच्या जनता विरोधी निर्णयामुळे सध्या पेट्रोल,डिझेल, गँस सिलेंडर च्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. यात सातत्याने वाढच होत असुन यांचा फटका बसून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, वाहनचालकांना, मालवाहतुकदारांना यांचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणाऱ्या दरवाढ़ीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडर च्या दरवाढी विरोधात देशभरात रोजच आंदोलने चालू आहेत तरीही मुक़्या, बहिऱ्या, आंधळ्या मोदी सरकारवर काहीच फरक पड़त नाही. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी प्रतिकात्मक "भैस के आगे बिन बजाना आंदोलन" करण्यात आले ज्याप्रमाणे रेड्यासमोर पुंगी वाजवून काही उपयोग नाही त्याच प्रमाणे मोदी सरकारला काही फरक पड़त नाही असेच दिसते आहे म्हणून आज आंदोलन करण्यात आले. व ईंधन दरवाढ ताबड़तोब मागे घ्यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विवेक कन्ना, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, गोविंद कांबळे, धनराज गायकवाड़, सुशीलकुमार म्हेत्रे, महेश लोंढे, जावेद कुरेशी, सुभाष वाघमारे, शाहु सलगर, शरद गुमटे, अभषेक गायकवाड़, मनोहर माचर्ला, सतीश संगा, शिव कोरे, रोहन गायकवाड़, लखन सुरवसे, अभिषेक बंटी गायकवाड़, शरद वाघमोड़े, अजय अवजुर, भारत करगुळे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शहभागी झाले होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.