करकंबमध्ये नरसाप्पा देशमुख गटाची हँट्रीक

 



(बाळासाहेब देशमुख यांच्या गटाची पिछाडी)


सोलापूर // प्रतिनिधी 

करकंब ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक विठ्ठल परिवार व आ बबनदादा शिंदे गटाचे नरसाप्पा देशमुख यांच्या गटाने 17 पैकी 9 जागांवर विजय संपादन करून ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम ठेवले  आहे तर महिला व बालकल्याणच्या माजी सभापती रजनी देशमुख यांच्या गटाला पराभव पत्कारावा लागला आहे




करकंब ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नरसाप्पा देशमुख व महिला बाल कल्याणच्या माजी सभापती रजनी देशमुख यांचे सासरे मारुती देशमुख या दोन सख्या बंधूंच्या गटात अत्यंत चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालाची आज सकाळ पासून मतदारांना उत्कंठा  लागली होती सायंकाळी 6 वाजता निवडणुकीचा निकाल समजताच कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करून आंनदोत्सव साजरा केला


विजयी उमेदवार


आदिनाथ देशमुख,महादेव व्यवहारे,तुकाराम माने,वैशाली देशमुख,कल्पना देशमुख,ज्योती शिंगटे,तेजमाला पांढरे,बाळूबाई खारे,तेजमाला पांढरे,रेखा जाधव,मारुती देशमुख,राहुल पुरवत,बापूराव शिंदे,पांडुरंग नगरकर,संतोष धोत्रे,बिलकीस बागवण,सुनीता हराळे, रेखा गायकवाड


चौकट- ग्रामपंचायत निवडणुक नरसाप्पा देशमुख यांचे पुत्र विद्यमान सरपंच आदिनाथ देशमुख यांनी युवक वर्गाला बरोबर घेऊन निवडणुकीत उडी घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाच्या जोरावर व जनतेशी असलेल्या थेट सुसंवादाचा फायदा झाल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या बाजूला विरोधी पँनलचे प्रमुख मारुती देशमुख यांनी पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत गट व कल्याणराव काळे गट तसेच भालके गटाचे जुने कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन निवडणूक लढविताना मारुती देशमुख यांचे पुत्र माजी झेड पी सदस्य बाळासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी झेड पी च्या माजी महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनी झेड पीच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर मतदारांपुढे जात होते. शिवाय  मारुती देशमुख गटासोबत असलेले दिग्गज मंडळींचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याने स्पष्ट झाल्याने मारुती देशमुख गटाचा झालेला पराभव त्यांना आत्मचिंतन करावयास भाग पाडणारा आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget