सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेनेही अनेक ठिकाणी आपली ताकद आजमावून बर्याच गावात प्रस्थापितांच्या विरोधात आपले खाते खोलले आहे.
देवडी येथील सुधाकर पवार आणि सिद्धेवाडी येथील दाजी शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले असून त्यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुकाध्यक्ष कैलास खडके, उपजिल्हाध्यक्ष हिंदुराव देशमुख, शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख, तुकाराम भोसले, राहुल सुर्वे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.