सोलापूर // प्रतिनिधी
सत्ता कुणाचीही येवो रणात जिंकण्यापेक्षा जनतेच्या मनात विजय होणं महत्वाचं असतं ही गोष्ट प्रचंड मोठी आहे.
मतदानाची सगळी टक्केवारी काढल्यानंतर असं लक्षात येतं की सर्वाधिक मतदान म्हणजे ३८% मतदान हे तिसऱ्या आघाडीला झालंय म्हणून जनतेच्या निवडणुकितला आमचा विजय हा आमचा नाही तर तो जनतेचा आहे हीच महत्वाची गोष्ट आहे.
स्पेशल लढलेले काळे-भालके आणि परीचारक गट यांचं विरोधात असणं आणि वेगवेगळ्या गोष्टी नजरेस पडणं या सगळ्यातही आपल्या आघाडी चे दोन उमेदवार ६ ते ७ मतांनी तर तीन उमेदवार थोड्या मतांनी पडले राहीलेल्या चोंघानी सुध्दा दोन नंबरला राहुन चांगली लढत दीली, म्हणजे जवळ पास सगळे च विजया पर्यंत पोहचले .तर दोन उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.
अर्थात जनतेने तिसऱ्या आघाडीला अखंड साथ दिली.
या सगळ्यानंतर एवढंच सांगेन
आघाडीतल्या सहकारी बंधुनो ३८टक्के मतदान हा आपला सर्वांचा प्रचंड मोठा विजय आहे. त्यामुळे न खचता आपल्याला काम करत रहायचं आहे.
आणि
लोकहो तुम्ही दिलेली साथ आम्ही कदापी विसरणार नाही कायम सोबत आहोत
सत्ता कालही नव्हती आणि आजही नाही पण लक्षात घ्या काम कालही करत होतो आणि आजही करतो उद्याही करत राहू.
या निवडणुकीत जिंकलेल्या गावातील सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन सगळे गावातले आहोत गाव एकसंघ ठेवू..कायम सोबत राहु.
गावातल्या सगळ्याना सांगेन
अडल्या नडल्या निम्म्या रात्रीला जरी हाक दिली तरीही तुम्ही या निवडणुकीत सहकार्य केले की नाही हे न पाहता मदतीसाठी उभा राहीन. कारण सदोदित गाव महत्वाचा आहे.
- आपलाच
नागेश रामहरी उपासे
पॅनल प्रमुख
रेणुकामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनल
तिसरी आघाडी

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.