४० वर्षाची सत्ता उलथवून नवयुवकांनी केला विशेष पराक्रम!





विठ्ठल/भीमा परिवाराच्या नेतृत्वाला सुस्ते करांनी केले मान्य


सोलापूर // प्रतिनिधी

गेल्या 40 वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील सुस्ते ग्रामपंचायती वरती सप्तशृंगी फायनान्सचे चेअरमन अतुल (भैया) चव्हाण यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले असून त्यांनी दिलीप आप्पा घाडगे यांच्या सत्तेला सर्व नवतरुण युवकांना सोबत घेऊन सुरुंग लावला आहे.


सर्व नवतरुण युवकांना प्रोत्साहन देऊन चेअरमन अतुल भैया चव्हाण यांनी एक हाती असलेल्या सुस्ते ग्रामपंचायतीवर ती निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे 13 पैकी आठ जागा जिंकत संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या सुस्ते ग्रामपंचायत वरती विठ्ठल भीमा परिवाराचा झेंडा बरेच वर्षांनी झळकावण्याची फार मोठे कार्य अतुल भैया चव्हाण यांनी पार पाडले आहे. त्यांच्या मदतीला भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुषार दादा चव्हाण, तानाजी नागटिळक, रामदास बापू चव्हाण, व माधव बापू चव्हाण, अनंता बापू चव्हाण यांनी त्यांना महत्वपूर्ण साथ दिली आहे.


या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विठ्ठल-भीमा परिवार प्रणित श्री अंबिका महाविकास पर्यावरण आघाडीचे 13 पैकी 8 उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे गेल्या 40 वर्षांपासून घाडगे गटाला 5 जागांवर समाधान मानावे लागले.
सप्तशृंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण, महादेव गावडे तानाजी नागटिळक हे घाडगे गटातून बाहेर पडल्याने व मतदारांमध्ये अंतर्गत मतभेद वाढले आणि निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. याचा फायदा विठ्ठल-भीमा परिवाराला झाला. चाळीस वर्षाचे सत्तापरिवर्तन झाल्याने सुस्ते गावात मुख्य गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

यावेळी तात्यासाहेब नागटिळक, तुषार चव्हाण, रामदास बापु चव्हाण, माधव बापु चव्हाण, धनंजय घाडगे, विजय नागटिळक, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, संतोष सुळे, गणेश बोबडे, एस.के. चव्हाण सर, संजय चव्हाण, संभाजी चव्हाण, अमोल चव्हाण, तानाजी शिंगण, अजिंक्य वाघमारे, संजय लोखंडे, आनंदा चव्हाण, विकास चव्हाण, मुकुंद चव्हाण, बाजीराव वाघमारे, सुभाष रणदिवे, देविदास वाघमारे, दत्तात्रेय वायदंडे, संजय रणदिवे, दत्तात्रय रणदिवे, मसु वाघमारे आदी उपस्थित होते.

सुस्ते येथील विजयी उमेदवार विठ्ठल-भीमा परिवार पॅनल मधून राणी चव्हाण, विष्णू गावडे, स्नेहा बोबडे, उर्मिला चव्हाण, नंदाबाई वायदंडे, तुषार चव्हाण, जुबेदा शेख, कांताबाई रणदिवे तर घाडगे गटाचे अनिल घाडगे, मनीषा कोळी, शकील तांबोळी, विशाल कसबे, दत्तात्रेय बोबडे हे उमेदवार विजयी झाले आहेत.

पराभूत झालेले उमेदवार घाडगे गटाचे विद्यमान सरपंच बाळासाहेब लोकरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ललिता चव्हाण, सुनंदा चव्हाण, मंगल चव्हाण, ज्योत्स्ना फडतरे, रेखा लोखंडे, राजाबाई सुळे तसेच विठ्ठल-भीमा परिवाराचे पांडुरंग कदम, जुबेदा शेख, आदम मुलानी, अजिंक्य वाघमारे, बालाजी नागटिळक यांचा पराभव झाला आहे.

 चौकट- गावातील सर्व विठ्ठल भीमा परिवारातील ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार आम्ही चांगल्या पद्धतीने व प्रामाणिकपणे करणार आहोत व सर्व राहिलेली विकास कामे सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करून पंढरपूर तालुक्यांमध्ये हे एक आदर्श ग्रामपंचायतीचे मॉडेल बनवणार असल्याचे अतुल चव्हाण यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget