नुकत्याच सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आ.प्रशांतराव परिचारक यांचे प्राबल्य दिसून आले तर मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये 22 पैकी 12 ग्रामपंचायतीमध्ये स्व.आ.भारत (नाना) भालके यांचे प्राबल्य दिसून आले याबरोबरच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीवर दामाजी सह.सा.कारखान्याचे चेअरमन समाधान (दादा) अवताडे यांनी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले
याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर वरती सत्ता प्रस्थापित केलेल्या DVP उद्योगसमूहाचे उद्योजक अभिजीत पाटील यांनी सुद्धा एक प्रकारे चंचुप्रवेश केला आहे त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून सर्व तरुण वर्गाचे एक मोठे जाळे पंढरपूर तालुक्यांमध्ये निर्माण केले आहे व नवतरूणांची मोठ बांधत आम्ही आगामी निवडणूकांसाठी तयार असल्याचे समर्धकांमधून बोलले जात आहे.
तसेच जिल्हा परिषद सदस्य व शिवसेने महिला आघाडीच्या नेत्या शैलाताई गोडसे यांनी नुकतेच पंढरपूर येथे ते आपले भव्य असे शिवसेना महिला आघाडीचे संपर्क कार्यालय सुरू करून आपणही पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडून येण्यास सक्षम असल्याचे सर्वांना विश्वास दाखवून दिला आहे.
याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील दुसरे सर्वात मोठे राजकीय प्रस्थ म्हणजे स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आ. प्रशांत परिचारक यांनी कालच पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी पंढरपूर नगरपालिकेमध्ये सर्व जाती धर्मांना न्याय देत योग्य स्थान देऊन व पंढरपुर-मंगळवेढा तालूक्यात मोर्चेबांधनी करत आपणही येणारी पोटनिवडणूक लढवु शकतो,असे दाखवून दिले आहे.
याच बरोबर सहकार शिरोमणीचे कल्याणराव काळे यांनीसुद्धा तालूक्याती ब-याच ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला असून येणा-या निवडणूकांसाठी मोर्चेबांधणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे.
याच बरोबर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचा भौगोलिक विचार करता पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये तसेच दोनही शहरांमध्ये स्व.आ. भारत (नाना) भालके यांनी आहोरात्र जनतेसाठी केलेले कार्य विसरून चालणार नाही याबाबतीत सहानुभूती व आपुलकी असणारे असंख्य समर्थक व कार्यकर्ते आपणास पाहायला मिळतात असल्यामुळे आमदार भगीरथ भालके हेच होतील व पुढील राहिलेले चार वर्ष पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी झोकुन देतील असे त्यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
[पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लागण्याची दाट शक्यता असून आगामी काळामध्ये पंढरपूर तालुक्यातील दोन मोठ्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या दोन सहकारी साखर कारखान्यांसाठी आप आपले पॅनल लावण्यासाठी सुद्धा काहीजण इच्छुक आहेत. या सहकारी साखर कारखान्यावर ज्या कुणाची सत्ता असेल तोच आजपर्यंतचा इतिहास सांगितला आहे जात आहे की तो पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा आमदार होतो. म्हणून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारात 2009 साली स्व. आ. भारत (नाना) भालके यांनी आमदारकी खेचून आणली त्यानंतरच्या काळामध्ये ३ वेळा सलग १२ वर्ष स्व.आ. भारत भालके हेच पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतरच्या काळामध्ये मतदारसंघांमध्ये खूप मोठा बदल होत गेला. व सत्तेची समीकरणे संपूर्णता दोन्ही तालुक्यात बदलत गेली काळानुरूप मतदारांची मानसिकताही संपूर्णपणे बदलले असून जो विकासकामांना प्राधान्य देईल त्यालाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आमदार होता येते].
येणाऱ्या आगामी काळामध्ये या सर्वांची गोळाबेरीज होऊन आगामी काळामध्ये आमदार कोण होतो. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.