समाजसेवक नितीन काळे यांना राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार प्रदान.




सोलापूर // प्रतिनिधी

पुरस्काराचे वितरण राज्यपालांच्या शुभेच्छा पत्राने व हभप ईंदुरीकर महाराज व खासदार सदाशिव लोखंडे  यांच्या हस्ते शिर्डी येथे संपन्न. समाजसेवक नितीन पांडुरंग काळे यांना राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार जाहीर झाला. पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभेच्छा पत्राने व ह भ प इंदूरीकर महाराज व खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच सेवा संघटनेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार ज्यांनी कोरोना  काळा मध्ये अनेक लोकांची सेवा केली अनेक युवकांना घडण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे असे सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व समाजसेवक नितीन पांडुरंग काळे यांना प्रदान करण्यात आला. नितीन काळे यांनी खूप लहान वयात चांगली प्रगती केली मला त्यांचा अभिमान वाटतो त्यांना राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांचे कार्य असेच वाढत राहो .व त्यांना अनेक पुरस्कार मिळत जावो .  त्यांचे कार्य जर पहायला गेलं तर खूप मोठे आहे. लहान वयात गरीब परिस्थितीतून आलेले नितीन काळे हे खूप कमी वयात राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत पोहचले आहेत त्यांना मी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा अनेक मान्यवरांनी दिल्या. मित्रपरिवार यांनी दिल्या. नितीन काळे यांनी असे सांगितले की हा पुरस्कार माझा नसून हा पुरस्कार माझ्या तमाम जनतेचा आहे ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली ज्यांनी मला साथ दिली त्यांचा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांचा आहे . असे नितीन काळे यांनी सांगितले. मी नेहमीच जनतेची सेवा करीत राहील. चांगले काम करत असताना अनेक पुरस्कार भेटत जात असतात म्हणून माझ्या कामाची दखल घेऊन सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी नुकताच मला राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार जाहीर केला. व पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते  मला प्रदान करण्यात आला. जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच सदैव तत्पर राहील व जनतेची सेवा प्रामाणिकपणे सेवा करील कधीही कोणाला जर माझी गरज लागली तर हक्काने सांगा नक्कीच त्याठिकाणी तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच हजर राहील. समाजाचे प्रश्न सोडवत असताना माणसाला जीवनात कोणत्याही अडचणी येत नसतात फक्त माणसाचे विचार पॉझिटिव्ह असले पाहिजे.  या समाजात आपण जन्माला आलो आहे म्हणजे या समाजात आपल्याला जन्माला येऊन समाजाला काहीतरी द्यायला लागतं. मी माझा काही वेळ समाजाच्या कार्यासाठी समाज सेवेसाठी देत असतो. आणि मी नक्कीच सांगतो समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि मी ती आयुष्यभर करणार. असेही राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नितीन काळे यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget