सोलापूर // प्रतिनिधी
वडील यंत्रमाग कामगार, आई विडी कामगार असलेल्या गरीब कुटुंबातील अंकिता भूमय्या सिलगानी हिला MBBS ला प्रवेश मिळाले आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या लक्ष्मीनारायन टॉकीज मागील निवासस्थानी जाऊन अंकिता सिलगानी हिचा सत्कार केला. तिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील स्वामी विवेवकानंद प्रशाला येथे झाले.
एका गरीब कुटुंबातील, बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या, शिक्षणाचा गंध नसलेल्या, वडील यंत्रमाग कामगार, आई विडी कामगार असलेल्या अंकिता सिलगानी हिने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या, अभ्यासाच्या जोरावर मेरिट मधुन विलासराव देशमुख शासकीय इंस्टुटुट ऑफ मेडिकल सायन्स लातूर येथे MBBS ला प्रवेश मिळविले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना डॉक्टर होण्याचे स्वप्न मनाशी बाळगुन गरीब परिस्थिती ही यशाचा अडथळा कधीच बनत नाही हे या अंकिता सिलगानी हिने सिध्द करुण दाखविले आहे. तिच्या यशामागे आई वडील, शिक्षक यांचेही कष्ठ आहेत. अंकितामुळे समाजातील ईतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होवो असे गौरवोद्गार आमदार प्रणिती शिंदे काढले.
यावेळी सोलापूर महापालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, लक्ष्मण बिंगी, भिक्षापती परकीपंडला, व्यंकटेश विडप, शंकर चौगुले, शिवाजी वग्गु, अंबादास दोंता, मुरली गोली, प्रकाश गुंडला, आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.