अवघ्या दहा वर्षाची ज्ञानेश्वरी शेटे बनली शिवचरित्रकार,बालकीर्तनकार म्हणून पंचक्रोशित ओळखली जात आहे

  



कीर्तनाच्या माध्यमातून चालवते माऊली गोरक्षण संस्थान


सोलापूर // प्रतिनिधी 

सध्या वारकरी संप्रदायमध्ये इंदुरीकर महाराज,बाबा महाराज सातारकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ज्ञानेश्वर महाराज पठाडे,शिवलीला ताई पाटील, मुक्ताताई चाळक आदींची कीर्तने राज्यभर गाजत आहेत.


कीर्तनाची संस्कृती अखंडित चालू राहावी म्हणून काही टि.व्ही. चैनलने स्वतंत्र कीर्तनाचा कार्यक्रम दाखवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याठीकाणी त्याहून काही वेगळे पहायला मिळेल  अकोला जिल्ह्यातील ह.भ.प गणेश महाराज शेटे   यांची 10 वर्षाची कन्या ह.भ.प ज्ञानेश्वरी दीदी शेटे हिने कीर्तनकार बनायची इच्छा तिचे बाबा हभप गणेश महाराज शेटे यांच्या जवळ व्यक्त केली असता कोरोना लॉकडाऊनच्या काळात वडिलांनी तिला कीर्तनाचे धडे दिले व तिने अल्पावधीतच सराव करून ईश्वरीय देणगी प्रमाणे कीर्तन करणे सुरू केले काही दिवसातच बघता बघता तिने राज्यभर किर्तनास सुरूवात केले आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून तिला मिळणारे मानधन हे स्वतःसाठी खर्च न करता ते सर्व मानधन तिने गोरक्षण संस्थेला देण्याचा मानस केल्याने तिच्यासाठी गोरक्षण संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.

 कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये अवघ्या जवळपास सहा महिन्यामध्ये ऑनलाईन बालसंस्कार शिबिर व काही संत मंडळींच्या मार्गदर्शनातून ज्ञानेश्वरी ही कीर्तनकार झाली सुध्दा व तिचे राज्यभर कीर्तन सुरू झाले याच प्रयत्नातून ज्ञानेश्वरीने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाल्याने तिचे पंचक्रोशित कौतुक होत असतांनाच कीर्तनाच्या माध्यमातून मिळणारे मानधन गोरक्षण संस्थेला मिळावे म्हणून गावांमध्येच माऊली गोरक्षण संस्थेची स्थापना करून तिला या संस्थेचे अध्यक्षपद दिले आहे .

ज्ञानेश्वरी दीदी दररोज हजारो लोकांमध्ये कीर्तन करून शिवचरित्र व संतांच्या विचारांचा वारसा चालवीत किर्तनाला सुरुवात केली असून कीर्तनामध्ये तिची बोलण्याची शैली, गायन, वारकरी पावळ्या,अभंग, अगदी सहज विनोद ह्या सर्व कला तिला अवगत असल्यामुळे धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी तिचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे. ज्ञानेश्वरी दिदि किर्तन करून आपलं शालेय शिक्षण सुद्धा अकोटला गुड सेफर स्कूलमध्ये घेत आहे. तिला एकही भाऊ नसून बहिणी आहेत याबाबत तिच्या वडिलांना  तीळमात्रही दुःख नाही कारण  मुलगी कर्तबगारी मध्ये मुलापेक्षा कोणत्याच क्षेत्रात कमी नाही या मुलीचा आदर्श इतरही मुलींच्या वडीलांनी घ्यावा अशीच ज्ञानेश्वरी शेटे आहे एवढया कोवळ्या वयात जेष्ठ कीर्तनकार सारखे कीर्तन करणे आणि वाहवा मिळविणारी बालिका कीर्तनकार ज्ञानेश्वरी भविष्यात खूप मोठी कीर्तनकार होणार असल्याचे संकेत आताच मिळत आहेत

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget