सोलापूर // प्रतिनिधी
दर्पणकार पत्रमहर्षी पंडीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार यांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम प्रा. श्रीशैल वाघमोडे सर यांच्या हस्ते आणि सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले .
सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारीतेचे जनक पंडीत बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने प्रा. श्रीशैल वाघमोडे यांच्या शुभहस्ते सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली आणि दै. सोलापूर भूषणचे कार्यकारी संपादक महेश हुंडाळे, दै. सोलापूर भूषणचे क्राईम रिपोटर प्रसाद जगताप, एस. बी. न्यूज चॅनलचे शिवानंद येरटे, एस. बी, न्यूजचे व्यवस्थापक श्रीनिवास बोगा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रा.वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांना व नागरिकांना वाघमोडे सर व विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी शुभेच्छा दिल्या .
सदर प्रसंगी स्नेहा सग्गम, शृष्टी भंडारी, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रशांत जक्का , गणेश म्हता, अर्चना चिलका , संध्याराणी कुऱ्हाडकर , अनिता बटगिरी , बिपीन साबळे , पप्पू शेख यांच्यासह पत्रकार बंधु - भगिनी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.