सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीची बेगमपूर येथे बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते. या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन, विमा योजना घरकुल योजना पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची चौकशी,राज्यातील पत्रकारांची नोंदणी, कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना तात्काळ पन्नास लाख रुपये मदत या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली
तालुका अध्यक्ष- अमर पवार तालुका सचिव- ज्ञानेश्वर गवळी तालुका उपाध्यक्ष-बंडू तोडकर तालुका संघटक -महादेव शेवाळे तालुका कार्याध्यक्ष-डॉ गणेश पडसाळकर तालुका कोषध्यक्ष-सागर पवार तसेच सदस्य म्हूणन शुक्राचार्य शेंडेकर शहाजी शिंदे त्याच बरोबर पंढरपूर येथील सदस्य औदुंबर गडदे यांची निवड करण्यात येऊन पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी व सदस्यांचा पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर शहर उपाध्यक्ष बिपीन दीड्डी अक्षय बबलाद बाबा काशीद, नवनाथ जाधव,पिंटू कपडेकर उपस्थित होते
या कार्यक्रम चे सूत्रसंचालन व आभार जेष्ठ पत्रकार संभाजी गोसावी यांनी केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.