पंढरपूर // प्रतिनिधी
ऊस तोडणीच्या कामगारांसाठी आलेल्या महिला भगिनींचा संक्रांत सण उत्साहात आणि गोड व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊसतोड करणाऱ्या महिलांच्या झोपड्यांवर जाऊन त्यांना साडी चोळीचा आहेर भेट देऊन तिळगुळ वाटप केले. मनसेच्या समाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत व कौतुक केले जात आहे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते आज पंढरपूर मोहोळ भागातील ऊसतोड महिला मजुरांना ही संक्रांत भेट देण्यात आली. राज्याच्या विविध भागात कोण ऊसतोडणी मजूर सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात आले आहेत. मजुरांना सणवार आणि उत्सव उसाच्या फडात साजरे करावे लागतात. दिवाळीसारख्या मोठा सण देखील त्यांना छोट्याशा झोपडीत आणि उसाच्या फडात साजरा करावा लागतो. सुवासिनी महिलांच्या आनंदाचा न्यूज संवत्सर मकर संक्रांत सण देखील आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मात्र पिढ्यान पिढ्या उसाच्या शेतात काम करणाऱ्या सुवासिनी महिलांना देखील मकर संक्रांत सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी मनसेने ऊसतोड करणाऱ्या महिलांना तिळगुळ वाटप करून त्यांना साडी चोळीचा हे ही या निमित्ताने भेट देण्यात आला. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी समाजातील उपेक्षित आणि गरजू लोकांना यापूर्वीही लॉकडाउनच्या काळात मोठी मदत करून त्यांना मदतीचा हात दिला आहे.
विविध सणा समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या मदतीसाठी त्यांची औंजळ नेहमीच रिती होती. आजही त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून गरीब व गरजू ऊसतोड मजूर महिलांना छोटीशी भेट देऊन मायेचा आधार दिला. त्यांच्या उपक्रमाचे महिला मजूर वर्गातून स्वागत केले जात आहे.
यावेळी तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, मोहोळ तालुका उपाध्यक्ष प्रशांत शेळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.