वृत्तसंस्था // प्रतिनिधी
सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस - कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या अंतिम वर्षातील तन्वीर हमीद इनामदार या विद्यार्थ्यांची स्पार्टन टेक्नॉलॉजीस या नामांकित कंपनीमध्ये ज्युनिअर इंजिनीअर म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना अव्वल कंपन्यांमध्ये स्थान देण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांची कारकीर्द आमच्यासाठी अधिक मूल्यवान आहे. असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थ्यास ३.६ लाखाचे पॅकेज मिळाले असून त्याचा आम्हाला गर्व असल्याचे सांगून त्याचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन.जगताप, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रमुख प्रा. सी. एच. मल्लारेड्डी सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.