वृत्तसंस्था // प्रतिनिधी
जोगेश्वरी येथील अरविंद गंडभीर शाळेतील एक हुशार विद्यार्थी म्हणून ज्याचा नावलौकिक होता असा अजित वैद्य सध्या नोकरी निमित्त परदेशात स्थायिक झाला असला तरी आपल्या मातृभूमीशी नाळ जोडणारा व येथील लोकांशी मायेचा ओलावा व आपुलकी न विसरता अद्यापही कायमचे संबंध ठेवणारा एक समाजसेवक आहे.
तसेच अजित वैद्य जरी परदेशात असला तरी त्याने भारतातील परिस्थितीची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मुंबईतील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनच्या काळात थेट दुबईतून पैसे पाठवून येथील गोर-गरीब, गरजू मजूर व रस्त्यावर फुगे व खेळणी विकणाऱ्या शेकडो कुटुंबाना किराणा किट आपल्या भारतातील मित्र मंडळींच्या माध्यमातून वितरण करून या कुटुंबियांचे उपसमारी पासून सरंक्षण केले.या सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच कोरोना योध्दा अजित वैद्य या समाज सेवकाचा अभिजित युथ फाऊंडेशन व दैनिक मुंबई मित्र दैनिक वृत्तमित्र यांच्या वतीने मानाचा कै. वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे स्मृती समाजभूषण पुरस्कार 2020 देऊन गौरव करण्यात आला. अजित वैद्य या समाज सेवकाच्या वतीने हा पुरस्कार त्याचे मोठे बंधू किरण वैद्य यांना प्रदान करण्यात आला. अशी माहिती समाजसेवक गणेश हिरवे यांनी दिली.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.