कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कासेगाव येथील यल्लमा यात्रा रद्द!



(प्रातिनिधिक स्वरूपात यात्रेचा सोहळा साजरा करण्यात येणार)


सोलापूर // प्रतिनिधी 

राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कासेगाव (ता. पंढरपूर) येथील यल्लामादेवीची वार्षिक  यात्र रद्द करण्यात आली आहे. प्रातिनिधिक स्वरूप यात्रेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेसाठी येवू नये असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


कासेगाव येथे जागृत यल्लामादेवीची देवीचे प्रसिध्द मंदिर आहे. येथे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 9 ते  11 जानेवारी दरम्यान भरणारी य॔दाची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

यात्रे दरम्यान देवीचे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने अनेक यात्रा प्रशासनाने रद्द केल्या आहेत. या मध्ये कासेगाव येथे भरणारी यल्लामादेवीची  यात्राही रद्द केली आहे.

मोजक्या मानकर्यांच्या उपस्थितीत यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात व कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी केली जाणार आहे. यात्रेत गर्दी होऊनये यासाठी जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.यात्रे दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी येवू गर्दी करूनये असे आवाहन ही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget