(वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे भीमा परिवाराची अजुन ताकद वाढली मा.खा.धनंजय महाडीक)
सोलापूर // प्रतिनिधी
नुकत्याच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती वरती भीमा लोकशक्ती परिवाराने परिवाराने वर्चस्व प्रस्थापित केले आहे यामध्ये बहुतांश ग्रामपंचायती या काठावरच्या फाईट होऊन. थोडक्यात विरोधी गटाच्या ताब्यात गेल्या आहेत.
त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कुरकुटे ग्रामपंचायती व शेवटी चिठ्ठीवर भीमा लोकशक्ती परिवाराचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे ही ग्रामपंचायत हातातून गेली आहे. याबाबतीत भीमा परिवाराचे सर्वेसर्वा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा खा. धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक, लोकशक्ती परिवाराचे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी ज्या पंचवीस ग्रामपंचायतीच्या उमेदवार आले आहेत त्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळामध्ये पंढरपूर मंगळवेढा व मोहोळ तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून या दृष्टिकोनातून या ग्रामपंचायती या दोन्ही परिवाराकडे येणे म्हणजे दोन्ही परिवाराला खूप मोठी ताकद मिळाल्याचे काही तालुक्यातील राजकीय जाणकार यावेळी सांगत आहेत.
चौकट- २५ ग्रामपंचायती आमच्या दोन्ही परिवाराच्या ताब्यात आल्यामुळे भीमा व लोकशक्ती परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे आगामी कारखान्याच्या निवडणुकीकरिता या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या म्हणजे आगामी काळातील निवडणुकीतील विजयाचा नारळ फुटला आहे.
(खा. धनंजय महाडिक, चेअरमन भीमा शुगर फॅक्टरी)


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.