ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तपकिरी शेटफळ येथे आवताडे गटाची एक जागा बिनविरोध
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अवताडे गट तयारीनिशी मोठया ताकदीनिशी रिंगणात
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यामधील १७ गावांमधील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, यामध्ये दामाजी कारखान्याचे चेअरमन व युवा नेते समाधान (दादा )अवताडे यांच्या गटांमध्ये ही ग्रामपंचायत निवडणूक मोठया ताकदीनिशी लढविण्यासाठी गावोगावी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. अशातच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम शिवशी तपकिरी शेटफळ येथील त्यांचे कट्टर समर्थक डॉक्टर शहाजी साबळे यांच्या पत्नी सौ. गौरी शहाजी साबळे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.यामुळे अवताडे गटाला विजयी सलामी मिळाली आहे.
या बिनविरोध निवड झाल्याबद्दल दामाजी कारखान्याचे चेअरमन माननीय समाधान (दादा )अवताडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या विजयामुळे आवताडे गटातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील १७ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया चालू असून या सर्व गावांमध्ये समाधान( दादा )अवताडे यांनी निवडणुकीसाठी पॅनल उभे केलेले असून निवडणुकीमध्ये बर्यापैकी यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.