पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग!



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे वृत्त समोर आले आहे. जेथे आग लागली आहे त्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्याप अजून समोर आलेले नाही.


सध्या कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून देशभरात लसीकरणास सुरु झाले आहे. मांजरी येथील याच ठिकाणी लसीचं उत्पादन केलं जात होतं. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट आहे. आज दुपारी २ वाजता सीरम इंस्टीट्यूटच्या इमारतीला आग लागण्यची माहिती मिळत आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी कोरोना लसीकरणाचे मोहीम सुरु असतानाच ही घटना घडली. सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. या इमारतील कोरोना लस सुरक्षित आहे, अशी माहिती BCG ने दिली आहे.


कोव्हिशील्ड लसचा प्रॉडक्शन प्लांट सुरक्षित


जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर 3, 4 आणि 5 या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget