(ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळत जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावण्यात यश)
सोलापूर // प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध समस्या ओळखून संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन श्री समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या सदस्यांकडून विविध विकास कामांकरीता लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून घेण्यात आला होता. या सर्व कामांच्या उद्धघाटनाचा सोहळा रविवार दि.28.02.2021 रोजी चेअरमन समाधान आवताडे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी चेअरमन समाधान आवताडे म्हणाले, "या विविध विकास कामांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांचे निराकरण होणार असून यापुढे देखील "लक्ष्मी दहिवडी' गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक माध्यमातून भरघोस निधी मिळवून देण्याकरिता मी कटिबद्ध आहे. तसेच एक कोटी पस्तीस लाख रुपये निधी तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ातुन प्रस्तावित असुन ते लवकरच मंजूर करुन कामे मार्गी लावत आहोत. आगामी काळात नुकतेच निवडून आलेल्या तालुकातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना देखील गावाच्या विकास कामा करीत माझे सदैव सहकार्य राहिल"
चेअरमन समाधान आवताडे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे अधिकारीक पद नसताना गावाच्या विकासाकरिता त्यांच्या कडून होणारी धडपड पाहून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी पं.स.मंगळवेढाचे मि.सभापती सुधाकर मासाळ, शिवसेना नेते येताळा भगर सर, जि.प.सदस्या सौ.मंजुळा कोळेकर, पं.स.मि.सदस्य लक्ष्मण मस्के, मार्केट कमिटी उपसभापती प्रकाश जुंदळे, सरपंच जुंदळे मॅडम, उपसरपंच पाटील मॅडम, कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण व संजय पवार, धनंजय पाटील, दिपक सुडके, अण्णा पाटील, डॉ. बनसोडे, विलास पाटील, अनिल बनसोडे, वाघमारे गुरुजी व लक्ष्मी दहिवडीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.... यावेळेस सदरील उद्घाटनासाठी पुणे येथुन रामचंद्र बनसोडे, मच्छिंद्र बनसोडे, गणेश बनसोडे व पंप्पु बनसोडे हे आवर्जून उपस्थित राहून दादांनी करत असलेल्या कामाचे कौतुक केले.
भूमिपूजन झालेली कामे -
१. लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायत निधीतून विजय चौक,चांदणी चौक,सिदोबा मंदिर,वीर चौक,म्हस्कोबा चौक,दहिवडकर महाराज मठ,पाटील वस्ती व सांगोला रोड येथे हायमास्ट दिवे बसविणे.
२. जिल्हा परिषद सदस्या सौ.मंजुळा कोळेकर यांच्या विशेष निधीतून देवळे येथून स्मशान भूमी पर्यंतचा रस्ता.
३. जिल्हा परिषद सदस्या सौ.शिलाताई शिवशरण यांच्या विशेष निधीतून माळी वस्ती ते स्मशान भूमी पर्यंतचा रस्ता.
४. पंचायत समिती सदस्या पाटील मॅडम यांच्या विशेष निधीतून शेलेवाडी व गुंजेगाव यांना जोडणारा पाणंद पर्यंतचा रस्ता या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांकडून होत होती.
५.१४ वा वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून बंदिस्थ गटार योजना.
६.१४ वा वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून साळे वस्ती येथे सिमेंट रस्ता.
७.१४ वा वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून वीर चौक ते चांदणी चौक आणि चांदणी चौक ते स्वामी चौक येथे सिमेंट रस्ता.
८. जिल्हा परिषद सदस्या सौ.मंजुळा कोळेकर यांच्या विशेष निधीतून दहिवडी ते महमदाबाद येथील ओढा खोलीकरण करणे.
९.१४ वा वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून गावात विविध ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे.
१०.पंचायत समिती सदस्या पाटील मॅडम यांच्या विशेष निधीतून बोअर दुरुस्ती करणे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.