महाराष्ट्र विधानसभेचे स्मृतिपत्र आमदार स्व.भारत भालके यांचे कुटूंबियांना सुपूर्द




सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार स्व.भारतनाना भालके यांच्या निधनामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने स्व.भारतनाना भालके यांच्या स्मरणार्थ शोक प्रस्ताव मंजूर करून स्मृतिपत्र त्यांचे कुटूंब मातोश्री श्रीमती खुशलाबाई, पत्नी श्रीमती जयश्रीताई, मुलगा श्री भगिरथदादा, भाऊ  श्री चंद्रकांतबापू, श्री पंडितनाना, श्री पंजाबकाका यांचेकडे विधानपरिषदेचे आ.श्री प्रशांत परिचारक, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी श्री गजानन गुरव, तहसिलदार श्री सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी श्री रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक श्री किरण अवचर, नायब तहसिलदार श्री तिटकारे यांचेकडून सरकोली, ता.पंढरपूर येथे सुपूर्द करण्यात आले.

              दि.28 नोव्हेंबर, 2020 रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार स्व.भारतनाना भालके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली, त्यावेळी तत्कालीन विधानसभेचे सभापती मा.ना.श्री नाना पटोले साहेब यांनी येथून पुढे विधानसभा सदस्य मयत झाल्यास त्यांना विधानसभेच्या वतीने स्मृतिपत्र देण्यात येईल असा निर्णय घेतलेला होतो. त्यानुसार महाराष्ट्र शासनाकडून सदरची अंमलबजावणी करून आमदार स्व.भारतनाना भालके यांच्या कुटूंबास सदरचे स्मृतिपत्र प्रदान करण्यात आले.

         यावेळी सरकोलीचे सरपंच श्री शिवाजी भोसले, उपसरपंच श्री भास्कर भोसले, मंडल अधिकारी श्री संतोष सुरवसे, तलाठी श्री आप्पासोा काळेल, ग्रामसेवक श्री शहाजी शेणवे यांचेसह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget