सोलापूर नवीन घरकुल खुलेआम अवैध मटका, जुगार, सुरू.; अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण?
सोलापूर // प्रतिनिधी
कुंभारी नवीन विडी घरकुल परिसरात* गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात खुलेआम मटका, जुगार, घरकुल भागातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे मटका मोठ्या प्रमाणावर खुलेआम घेण्यात येत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे.बेकायदा दारू विक्रीबरोबरच गुटखा बेकायदेशीरपणे विक्री अनेक ठिकाणी होत आहे.
नवीन विडी घरकुल भागातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर मटका धंदे खुलेआमपणे सुरु असतानाही कारवाई झाल्याचे चित्र कोठेही दिसून येत नाही.संबंधित बीट अंमलदारांना,बेकायदा धंद्यांची माहिती असूनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पोलिस विभागाचे सोयीस्कर या अवैध व्यावसायाकडे दुर्लक्ष होत असल्याने नवीन विडी घरकुल कुंभारी हाचे गाव वळसंग भागातील अवैद धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याचे चित्र आहे. काही पोलिसांची चेरी मेरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून, काही पोलिस कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वरकमाईत गुंतलेले दिसतात.
एखाद्या महिन्याला एखाद्याची वारी चुकली, तर दुसऱ्या महिन्यात दोन हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरासह नवीन विडी घरकुल भागात अवैध व्यवसाय जोमात सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
ढाब्यावर खाकी : तरीही विक्री बेकायदा दारू विक्री होणाऱ्या ढाब्यांवर दौऱ्याच्या निमित्ताने काही ‘खाकी’ वर्दीवाल्यांची वर्दळ असते. त्यावेळी या ठिकाणी खाण्या-पिण्याचा कार्यक्रमही रंगलेला असतो. अनेकदा त्यासाठी स्पॉन्सर असतो. किंंबहुना ढाबेवाल्यांकडूनच खूश केले जात असल्याचे चित्र दिसून येत असून, खाकीच्या अशा वागणुकीची नागरिकांत खुलेआम चर्चा सुरु आहे.
या ठिकाणांची आणि सर्वच बेकायदा अड्ड्यांची माहिती खाकीतील काही कारभाऱ्यांना आहे. अशाच एका खाकीवाल्याकडून प्रत्येक महिन्याला न चुकता दारु विक्रेत्यांकडून रुपयांचा मलिदा बेकायदा घेतला जातो. पोलिस ठाण्याच्या आवारापासून लांब अंतरावर असे व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.