सोलापूर // प्रतिनिधी
जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रभाकर भैय्या देशमुख यांचा शिव सरपंच सेवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला गौरव. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांचा सत्कार सोहळा शिव सरपंच सेवा संघटनेचे व आदर्श ग्राम विकास फाउंडेशन सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी भैय्यासाहेब यांनी पाटकुल ग्रामपंचायतीवर जनहित शेतकरी संघटनेची सत्ता आणल्यामुळे व सरपंच जनहित शेतकरी संघटनेचा झाल्यामुळे किंगमेकर प्रभाकर भैय्या देशमुख यांचा सत्कार नितीन काळे यांनी केला. व त्यांच्या कामाचे कौतुक केले व एका चांगल्या ग्रामपंचायतीवर जनहित शेतकरी संघटनेचे वर्चस्व आल्यामुळे गावाचा विकास नक्कीच होणार व भैय्यासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत एक नंबरला येणार असे नितीन काळे यांनी सांगितले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत निकम व असंख्य शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.