रयत क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमर पवार यांची निवड

 



सोलापूर // प्रतिनिधी 

रयत क्रांती संघटनेच्या सोलापुर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी येथील अमर दत्तात्रय पवार यांची निवड करण्यात आली असून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषि राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.


आ.सदाभाऊ खोत हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते.यावेळी निवडक पदाधिकारी यांच्या बैठकीत निवडीचे पत्र देण्यात आले.या बैठकीस रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष दिपक भोसले व रयत क्रांती संघटनेचे सोलापुर जिल्हा समन्वयक तथा राज्य कृषी मुल्य आयोगाचे मा. सदस्य प्रा.सुहास पाटील, जिल्हाध्यक्ष नंदकुमार व्यवहारे, जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे,पंढरपूर ता.अध्यक्ष सुनील पाटील,करमाळा ता.अध्यक्ष शिवशंकर जगदाळे,राज्य कोअर कमिटी सदस्य अजय बागल, माढा ता.संघटक प्रशांत करळे,माढा ता.उपाध्यक्ष अमोल गवळी,छगन पवार,आप्पासो गवळी,विनायक जाधव,सुजित डाळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आवाहन आ.सदाभाऊ खोत यांनी सर्व पदाधिकारी यांना केले.या निवडीनंतर अमर पवार यांनी आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबुत करून, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्यपद्धती प्रमाणे व भारतीय राज्यघटनेस आदर्श मानुन संघटनेत काम करणार आहे.तसेच शेतकरी,शेतमजुर,कामगार,विद्यार्थी व इतर समाज घटकांच्या हक्कासाठी व सन्मानासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget