सोलापूर // प्रतिनिधी
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रतीक्षा इंगळे या विद्यार्थिनीला एक्यूएम टेक्नॉलॉजीस या नामांकित कंपनीमध्ये ३ लाखाचे पॅकेज मिळाले आहे. पुणे येथील एक्यूएम टेक्नॉलॉजीस या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनीअर म्हणून निवड झाली आहे. सदर विद्यार्थिनीने ‘क्यू स्पायडर’ या नामांकित कंपनीमध्ये फॅबटेककडून प्लेसमेंट होऊन दोन महिन्याचे मोफत ट्रैनिंग घेतले होते.या विद्यार्थिनींची निवड ‘क्यू स्पायडर’ कडून झाल्याची माहिती ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडार यांनी दिली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी अभिनंदन केले. यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा तसेच मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. संजय पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.