बेकायदेशीर ठेकेदारी विडी कारखाने त्वरित बंद करा. कामगार सेनेचे कामगार सहाय्यक आयुक्तांना निवेदन



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरातील बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ठेकेदारी विडी कारखाने त्वरीत बंद करा अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे केली आहे . 

         महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सोलापूरात ठेकेदारी विडी कारखाने मोठ्याप्रमाणात असून या कारखान्यात हजारो विडी कामगार काम करतात . या ठेकेदारी विडी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना प्रॉयव्हेट फंड , किमान वेतन , हक्क रजा , बोनस व इतर कायदेशीर कुठलेही हक्क मिळत नाही उलट तुटपुंजी मजुरी देऊन काम करुन घेतात . अशा प्रकारे सर्व कायदेशीर बाबींचा पुर्तता न करता ठेकेदार विडी कारखानदार कारखाने चालवित आहेत यामुळे ठेकेदारी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना असुरक्षित जीवन जगावे लागत आहे . इतकेच नव्हे तर केवळ पोट भरण्यासाठी हे कामगार काम करत आहेत . महिला विडी कामगारांच्या ह्या मजबुरीचा फायदा घेऊन ठेकेदार विडी कारखानदार हे मनमानी पध्दतीने महिला विडी कामगारांवर अन्याय करुन प्रचंडप्रमाणे आर्थिक फायदा करुन घेत आहेत . 

         तरी माननीयांनी अश्या प्रकारचा ठेकेदारी विडी कारखान्याचे परवाना रद्द करुन त्वरीत बेकायदेशीर ठेकेदारी कारखाने बंद करावे . ही नम्र विनंती . असे नमूद करण्यात आले . *सदर निवेदनाचेप्रत माहितीत्सव : - १. मा . मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई . २. मा . उपमुख्यमंत्री , . महाराष्ट्र राज्य मुंबई . ३. मा . कामगार मंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई . ४. मा . कामगार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई . ५. मा . पालकमंत्री , सोलापूर जिल्हा. यांना पाठविण्यात आले आहे .

          सोलापूरातील बेकायदेशीर ठेकेदारी विडी कारखाने त्वरीत बंद करावे या मागणीचे निवेदन विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्तांना देतांना दशरथ नंदाल , गणेश म्हंता , पप्पु शेख , शोभा पोला , रेखा आडकी , अनिता बटगिरी , अर्चना चिलका , संध्याराणी कु - हाडकर , आदि उपस्थित होते .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget