वृत्तसंस्था // प्रतिनिधी
तामिळनाडूमध्ये फटाक्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. विरुधुनगर इथं शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास एका कारखान्यात मोठी आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी गेल्यावर्षी कुडलोर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. तेव्हा सात जणांना यामध्ये प्राण गमवावे लागले होते. चेन्नईपासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर कट्टुमनारकोली भागात हा कारखाना होता.
तामिळनाडूत शिवाकाशी हे देशातलं सर्वात मोठं फटाके निर्मिती होणारं ठिकाण आहे. इथं जवळपास प्रत्येक घरात फटाक्यांची निर्मिती होते. शिवाकाशीमध्ये हजारांहून अधिक कारखाने असून वर्षाला इथल्या फटाके व्यवसायाची उलाढाल ही 3 हजार कोटी रुपयांपर्यंत होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.