धाराशिव साखर कारखाना, युनिट क्र.३ येथे राज्याचे साखर आयुक्त मा.श्री.शेखरजी गायकवाड साहेब व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते ४ लाख ९१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.यावेळी संपूर्ण कारखान्याची त्यांनी पाहणी केली. साखर कारखानदारी अतिशय उत्तमरीत्या, सक्षम
पणे आपण चालवीत असल्याबाबत कौतुक केले. हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवित असून अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि कुठेही गळती नसलेला असा कारखाना आपण प्रथमच पाहतो आहोत असेही ते म्हणाले.
आपल्या कारखानाची साखर पांढरी शुभ्र, दाणेदार आणि उत्पादनही अत्यंत उत्कृष्ट, असून या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना या कारखान्यातून न्याय मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न या बंद कारखान्यामुळे ऐरणीवर होता. मात्र कारखाना चालू करून हा प्रश्न आपण मार्गी लावला त्याबद्दल कारखान्याचे संचालक व चेअरमन अभिजीत पाटील यांचे अभिनंदन साखर आयुक्तांनी केले.
याप्रसंगी श्री.वांगे साहेब, श्री. वाडीकर साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अमर पाटील, संचालक श्री. भागवत चौगुले, श्री. संजय खरात, श्री. दिपक आदमिले, प्रगतशील बागायतदार श्री. केरू सावकार, श्री. बाबा जामगे, ओंकार पाटील, गणेश रणदिवे, अक्षय रणदिवे,तसेच जनरल मॅनेजर ढाके, चिफ इंजिनिअर पवार, चिफ केमिस्ट पेठे सर्वअधिकारी, कर्मचारी वर्ग व परिसरातील ग्रामपंचायत सदस्य मान्यवर, शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.