शिवजयंतीनिमित्त आजनसोंड येथे मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन.

 


हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुर तालुक्यातील आजनसोंड येथे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रदेश सरचिटणीस ,शाडो सहकारमंत्री दिलीप (बापु) धोत्रे यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले ,शिवप्रेमी तरुण मंडळ यांच्या व मा.शशिकांत पाटील मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीराचे दिलीप (बापु) धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


  हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या जयंती निमित्ताने अजनसोंड येथील शिवप्रेमी तरुण मंडळयांच्या वतीने गेली पंचवीस वर्ष झाले भव्य रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम राबवतात हे प्रेरणा दायी आहे,,रक्तदान हेच सर्व श्रेष्ट दान आहे,


त्याचप्रमाणे याहीवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे शिवप्रेमी तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते ,कोरोनाच्या या संकट काळात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, आज आजारी लोकांना रक्ताची गरज आहे,, अजनसोंड येथील शिवप्रेमी तरुण मंडळाचा आदर्श घेऊन सर्वांनी समाजपयोगी कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन दिलीपबापू धोत्रे यांनी केले,या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले,


यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका अध्यक्ष मा.शशिकांत पाटील,विभाग प्रमुख नागेश इंगोले,हणमंत वाघमारे,उपसरपंच तानाजी बापु शिरगिरे,शिवाजी घाडगे ,बाळासाहेब वायदंडे,आंकुश डूबल ,सागर बर्गे,रंगनाथ डुबल,काकासो कांबळे माजी सरपंच ,एकनाथ डुबल, आण्णा डुबल,हारीश शिरगिरे,शहाजी शिरगिरे,समाधान शिरगिरे,शिवाजी पाटील,रामा सुतार,राहुल सोनार, अभिजित डूबल,समाधान डूबल ,भाऊ मोरे,सुनील पवार, राजेंद्र घाडगे,     आदी मान्यवर व तरूण युवक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget