"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र करून अतिशय छोट्या ताकदीने पण पूर्ण व प्रबळ जिद्दीने प्रचंड अतिशय जुलमी राजवटीविरूद्ध लढा दिला व तो यशस्वी करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तसेच आपण सर्वजण एकत्र येऊन मागील वर्षभर संपूर्ण जगाला भंडावून सोडणार्या कोरोनाच्या संकटाशी सामना करूया. व आपले गाव, आपला देश याची या महाभयंकर अशा कोरोना संकटातून मूक्तता करूया." असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळूज, ता. पंढरपूर जि सोलापूर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना पुळूज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ब्रम्हदेव घाडगे यांनी केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व सामाजिक अंतर राखत हा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, पंढरपूर तालुक्याचे युवा नेते जिल्हा परिषद माजी सदस्य व्यंकटराव अण्णा भालके, विविध कार्यकारी सोसायटी पुळूजचे चेअरमन विनोद महाडिक,भीमा सहकारी साखर कारखाना माजी संचालक रतिलाल आप्पा गावडे, राजू बापू गावडे, सरपंच शिवाजी शेंडगे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रमेश बाबर, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात, पांडुरंग ताटे, शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष समाधान लोमटे, राजाराम बाबर, अंबादास बाबर, संजय खरात, भारत पाटील, विनायक पाटील, शहाजी भोसले, बापु शिंदे, धनाजी देशमुख, बच्चू धनवे, कुंडलिक भोसले, आश्रोबान येळे, संतोष रणसिंग, पैलवान महादेव शेंडगे, जिगर मुलानी, ग्रामपंचायत सदस्य सिताराम भोसले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेश कांबळे, राजू माने, किशोर म्हमाणे, सतीश गोरे, नवनाथ गोरे, पांडुरंग म्हमाणे, सतीश चव्हाण, जयराम पाटील, गावातील शिक्षक चव्हाण गुरूजी, केंद्रप्रमुख ब्रह्मदेव घाडगे, मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड, शिक्षक विठ्ठल टाकळे, सागर सोनवले, विनोद राजमाने, सचिन निरगिडे, सिद्धेश्वर भुई व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री पांडुरंग ताठे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.