(सर्व सरपंचाच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहणार:- नितीन काळे)
सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्यायहक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना शिव सरपंच सेवा संघटना व आदर्श ग्रामविकास फाउंडेशन . शिव सरपंच सेवा संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी व आदर्श ग्रामविकास फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नितीन काळे यांची एकमताने निवड करण्यात आली. आज पुणे येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते नितीन काळे यांची निवड करण्यात आली. शिव सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामविकास फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई शुक्ला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. शिव सरपंच सेवा संघटना सर्व सरपंचांना हक्कासाठी लढत आहे. येणाऱ्या काळात आदरणीय सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन शिव सरपंच सेवा संघटनेचे महत्त्व व कार्य सांगून प्रत्येक ग्रामपंचायत आदर्श कशी बनवता येईल याकडे शिव सरपंच सेवा संघटनेचे लक्ष असणार आहे. कोणतेही सरपंचावर अन्याय होऊदया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिव सरपंच सेवा संघटना धावून येईल असेही सरवदे साहेब यांनी सांगितलं. शिव सरपंच सेवा संघटनेच्या माध्यमातून सरपंचांना प्रशिक्षण व ज्या काही सरकारच्या ग्रामपंचायतीने योजना असतील त्या सर्व योजना ग्रामपंचायतीला शिव सरपंच सेवा संघटना मिळवून देईल असेही शिव सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सरवदे साहेब यांनी सांगितले. येत्या 8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. असे शिव सरपंच सेवा संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.