सोलापूर // प्रतिनिधी
साबळे वाघिरे विडी कंपनीतील लेबल व पॅकींग कामगारांच्या मागण्या संदर्भी कामबंद आंदोलन केल्याने कारखाना व्यवस्थापना कच्चा मालाचा साठा करण्याचे अडचण सांगून विडी कामगारांना कच्चा माल न दिल्यामुळे विडी कामगारांचे आर्थिक नुकसान होणार आहे . म्हणून विडी कारखाना त्वरीत सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले .
मा . सहाय्यक कामगार आयुक्त यलगुंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुर शहरातील साबळे वाधिरे विडी कंपनीतील लेबल लावणाऱ्या कामगारांच्या मागण्यामुळे लेबल कामगारांनी ४ जानेवारी २०२१ पासून संप पुकारला आहे . याची संपूर्ण जबाबदारी साबळे वाधिरे विडी कपंनी व्यवस्थापनाची असून यामुळे विनाकारण महिला विडी कामगारांचे आर्थिक नुकसान होऊन उपासमार होण्याची शक्यता आहे . म्हणून लेबल कामगारांची समस्या त्वरीत सोडवुन विडी कारखाने ताबडतोब चालु करावे असा आदेश साबळे वाघिरे विडी कंपनीला देण्यात यावे .
तरी माननीयांनी मा . सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने साबळे वाघिरे विडी कंपनी त्वरीत चालु करुन विडी कामगारांना न्याय द्यावे . ही नम्र विनंती . असे नमूद करण्यात आले आहे .
मा . सहाय्यक कामगार आयुक्त यांना विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात पद्माताई म्हंता , शशिकला कैरमकोंडा , विठ्ठल कु - हाडकर , अनिता बटगिरी , प्रशांत जक्का , अर्चना चिलका , प्रसाद जगताप , संध्याराणी कुऱ्हाडकर , गणेश म्हंता , बिपीन साबळे , शिवानंद येरटे , यांच्यासह कामगार सेना पदाधिकारी उपस्थितीत होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.