पंढरपूर // प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सौ.चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप पंढरपूर यांच्यावतीने विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.
यामध्ये कुष्ठरोग वसाहत, बेघर वस्ती, नवजीवन बालकाश्रमामध्ये फळे व मास्कचे वाटप करण्यात आले आहे कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता या सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला
तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, हळदीकुंकू समारंभ त्याचप्रमाणे पंढरपुरातील अनाथ आश्रम मध्ये मिष्ठान्न भोजन व राम कृष्ण हरी वृद्धाश्रम मध्ये सुद्धा मिष्टान्न भोजन देण्यात आले असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे विदुल आधटराव यांनी सांगितले
त्याचप्रमाणे भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप पंढरपूर यांच्यातर्फे गरीब कुटुंबातील ज्याला तीन मुली आहेत त्यातील एका मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेअंतर्गत ठेव(DEPOSIT)ठेवणार असल्याचे सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपचे विदुल अधटराव यांनी जाहीर केले आहे त्याच प्रमाणे चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव यांनी केले आहे.




Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.