स्व.भारतनानाच्या वारसालाच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार:- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील!'



 

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या राष्ट्रवादीमधील उमेदवाराबाबत जनतेच्या मनात नेमके काय आहे तेच होणार आहे. जिल्हाध्यक्षांनी भगीरथ भालकेबाबत भूमिका स्पष्ट केल्याने उमेदवारी वारसाला मिळणार असल्याचे सुतोवाच सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.


स्व.भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसंवाद यात्रेच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजन पाटील हे होते. व्यासपीठावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आ.संजय शिंदे, आ.प्रणिती शिंदे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, उत्तमराव जानकर, प्रकाश पाटील, उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राहूल शहा, लतीफ तांबोळी, जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, संभाजी शिंदे, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, अजित जगताप, विजय खवतोडे, नितीन नकाते, दत्ता मस्के, अॅड नंदकुमार पवार, भारत बेदरे, मारूती वाकडे, रामचंद्र वाकडे, मुजम्मील काझी, संगीता कट्टे, दिलीप जाधव, पी.बी.पाटील, अॅड शिवानंद पाटील, बसवराज पाटील, गुलाब थोरबोले आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना सहकारमंत्री म्हणाले की, ज्या विश्वासाने संधी दिली त्याच विश्वासाने जनतेचे काम केले. त्याच्या दमदार आवाजाबरोबर पंढरपूरचे आमदार म्हणून जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवायचे. सर्वसामान्याचे प्रश्न मांडण्याची तळमळ असल्याने त्यांना विधानसभेत अधिक वेळा संधी मिळायची, म्हणून त्या कामाची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.


आ.प्रणिती शिंदे म्हणाल्या की, नानाचा दरारा मतदारसंघात नाहीच तर विधानसभेतही होता. ते बोलताना उभारले की सभागृह शांत व्हायचे, त्याची उणीव भासत असली तरी बहीण म्हणून मी भगीरथच्या पाठीशी आहे.


जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील  म्हणाले की,  विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अनेक नावे पुढे येत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसने स्व आ.भालके यांच्या घराबाहेरच्याला संधी दिली तर पक्षाला ही जागा गमवावी लागेल असा इशारा दिला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget