तिरुपती विमान सेवा 22 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रदीर्घ पाठपुरावा

 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 11 महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर तिरुपती विमान सेवा 22 फेब्रुवारीपासून आठवड्यातील सातही दिवस नेहमीच सुरू होत असून यामुळे कोल्हापूर विमानतळावरील विमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.तिरुपती व अहमदाबाद या दोन्ही मार्गावरील विमानसेवा 22 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे प्रदीर्घ काळापासून कोल्हापूर विमानतळावरील विविध शहरांना  प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.



 या विमानसेवेचे बुकिंग इंडिगो एअरलाइन्स च्या संकेतस्थळावर  सुरू झालेली आहेत.

कोल्हापूर विमानतळावरून अलाइंस एअर या कंपनीची हैदराबाद व बेंगलोर या शहरांना तर ट्रु जेट कंपनीची मुंबई विमान सेवा सुरू असून इंडिगो एअरलाइन्स या कंपनीची हैदराबाद कोल्हापूर अशी विमानसेवा सुरू आहे. दरम्यान इंडिगो एअरलाइन्स कोल्हापूर तिरुपती विमान सेवा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खंडित झाली होती मुंबई, हैदराबाद व बंगलोर या मार्गावरील विमानसेवा सुरू झाल्या तरीही तिरुपती मंदिर बंद असल्याने प्रवाशांचा तिरुपती विमान विमान सेवा अकरा महीने   ही विमानसेवा खंडीत ठेवावी लागली होती. परंतु तिरुपती मंदिर प्रवेश व दर्शन सुरू झाल्यानंतर पुन्हा कोल्हापूर तिरुपती विमान सेवा इंडिगो एयरलाइंस कडून सुरू करण्यात येत असून २२ फेब्रुवारीपासून दुपारच्या सत्रामध्ये आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा सुरु होत आहे. त्याचबरोबर २२ तारखेपासूनच इंडिगो एअरलाइन्स ची या कंपनीची कोल्हापूर अहमदाबाद नवीन मार्गावरील विमानसेवाही आठवड्यातील तीन दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सुरू होत आहे. यामुळे कोल्हापूर विमानतळावरून दिवसाला १२ विमानांचे आवागमन होणार असल्याने कोल्हापूर विमानतळावरील विमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.


तिरुपती विमानतळावरून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी टेक-ऑफ तर दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी कोल्हापूर मध्ये लॅन्डींग , पुन्हा सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून तिरुपतीसाठी  टेक-ऑफ तर ५ वाजून ३५ मिनिटांनी तिरुपती विमान तळावर लँडिंग होईल.

कोल्हापूर विमानतळावरील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण पाठपुरावा करीत अनेक प्रश्न तडीस नेण्यासाठी यशस्वी ठरलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर चा हवाई वाहतूक चेअरमन ललित गांधी यांचे विमान प्रवासी व कोल्हापूरची नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget