सोलापूर // प्रतिनिधी
केंद्र शासनाने शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या समस्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे . आणि विरोधी कायदे करून शेतकरी व कष्टकऱ्यावर पुर्णपणे अन्याय करीत आहेत . यावरून भारत देशात शेतकरी व कष्टकरींना वाईट दिवस आलेत असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी विडी कामगारांच्या बैठकीत बोलतांना केले .
आपल्या भारत देशात शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणून बहुमान आहे . मातीत राहुन मातीतुन सोने पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधी केलेले कायदा रद्द करावे . म्हणून गेल्या तीन महिन्यापासुन दिल्लीत आंदोलन करीत आहेत . शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सुंपुर्ण देश पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग देत आहेत . तरीही केंद्रातील मोदी सरकार पुर्णपणे दुर्लक्ष करून आंदोलन उध्दवस्त करण्याचे प्रयत्न करीत आहेत . त्याच बरोबर कष्टकरी कामगारांच्या हिच आवस्था आहे . यावरून आपल्या भारत देशात स्वतंत्र झाल्यापासून हि आवस्था पहिल्यांदाच शेतकरी व कामगारांवर आले आहे . ज्या देशात शेतकरी व कष्टकरी सुखी राहत नाही , तो दश कधीही विकास होत नाही . हे सिध्दांत आहे . म्हणुन कामगार बंधु - भगिनींनी आपल्या मागण्या संदर्भी एकजुटीने संघर्ष करणे गरजेचे आहे असे म्हणाले .
माँ साहेब विडी घरकुल वसाहतीतील नागरीसुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सर्व कामगारांनी . संस्थेच्या पाठिशी उभे रहावे असे कारमपुरी ( महाराज ) यांनी म्हणाले .
माँ साहेब घरकुल वसाहतीत नागरी सुविधा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आले . त्या बैठकीत कामगार बंधु -भगिनींनी आपले समस्या मांडल्या . सदर बैठकीत विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्यासह श्रीनिवास चिलवेरी , श्रीनिवास यनगंटी , प्रशांत जक्का , बिपीन साबळे आदि उपस्थित होते .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.