माँ साहेब घरकुल वसाहतीत सुविधा पुरविण्यासाठी सहकार्य करणार.:- मा.खा.श्री.विनायक राऊत





सोलापूर // प्रतिनिधी 

दक्षिण सोलापूर ' कुंभारी येथे बेघर महिला विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या स्वर्गीय मिनाताई ठाकरे घरकुल वसाहतीत नागरी सुविधा व मुलभुत गरजा मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असे आश्वासन शिवसेना सचिव व खासदार मा . श्री . विनायक राऊत यांनी माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले . 
        माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने महिला विडी कामगारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातुन बांधण्यात आलेल्या विडी घरकुल वसाहतीत नागरी सुविधा अभावी अनेक अडचणी येऊन विविध समस्या निर्माण होत आहेत . म्हणुन संस्थेच्या वतीने संस्थापक श्री . विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी नागरी सुविधा व मुलभुत गरजा पुरविण्यासाठी मा . मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे यांच्याशी विशेष बाब म्हणुन प्रयत्न करणे आवश्यक आहे . यासाठी मा . मुख्यमंत्री बरोबर बैठक आयोजन करण्यासाठी सहकार्य करावे , अशा आशयाचे निवेदन मा . विनायक राऊत साहेब यांना देण्यात आले . त्यावरून मा . श्री . विनायक राऊत साहेब यांनी याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्याच बरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातुन शेतमजुर व असंघटित कामगारांच्या मागण्यासंदर्भी मा . मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल , असेही मा . विनायक राऊत साहेब यांनी सांगितले . 
          विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली मा . विनायक राऊत साहेब यांना निवेदन देणाऱ्या शिष्ठमंळात विठ्ठल कु -हाडकर , शिवा ढोकळे , संजीव शेट्टी , मनोज राऊत यांचा सहभाग होता .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget