सोलापूर जिल्हातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार!


(सहकारी साखर कारखाने सुद्धा यामध्ये समाविष्ट असणार)


सोलापूर // प्रतिनिधी

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पंढरपूर मंगळवेढा व मोहोळ तालुक्याच्या आर्थिक विकासाची नाडी असलेल्या पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची व मोहोळ तालुक्यातील नावाजलेल्या प्रतिष्ठित अशा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या पंधरा दिवसांमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती

महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी शासनाच्या संकेतस्थळावरून दिली आहे.

16 जानेवारी 2021 रोजी शासनाने 31 मार्च पर्यंत कोणत्या निवडणुका घेता येणार नाहीत असे सांगितले होते तो आदेश आज रद्दबातल करत येणाऱ्या काळामध्ये ज्या सहकारी संस्थांची मुदत संपत आहे त्या सर्व संस्थांच्या निवडणुका पार पडतील असे या आदेशामध्ये म्हटले आहे. covid-19 च्या प्रादुर्भावामुळे या सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या पण राज्यात नुकत्याच शिक्षक आमदारकीच्या व पदवीधर मतदार संघाच्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्यवस्थित व अत्यंत शांततेमध्ये मध्ये संपन्न झालेले आहेत. त्यामुळे या निवडणुका सुद्धा covid-19 च्या प्रादुर्भाव होणार नाहीत याची सर्व दक्षता घेऊन संपन्न होतील.

यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय ताकतीवर परिणाम करणारी निवडणूक म्हणजे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा होणार आहे आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर जो विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन असतो तो पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतो.हे त्रिकालबाधित सत्य आहे पंढरपूर  तालुक्यामध्ये बऱ्याच अंशी या निवडणुकीचे उत्सुकता आहे बावीस हजार ते पंचवीस हजार सभासद संख्या असणाऱ्या या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक होणार असल्यामुळे सर्व सभासद आतापासूनच जागृत झाले आहेत.

याचबरोबर मोहोळ तालुक्यातील सर्वात महत्त्वपूर्ण असे व मोहोळ तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर चे टाॅप-वन असणारी भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा होऊ घातले आहे या कारखान्यावर ती सद्यस्थितीला माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या संपूर्ण पॅनलचे वर्चस्व आहे.

या कारखान्याने सुद्धा आपली सभासद संख्या वाढवली असल्यामुळे या कारखान्याचे चेअरमन व सर्व संचालक मंडळांना ही निवडणूक सोपी होणार असल्याचे काही राजकीय जाणकारांचे मत आहे या निवडणुकी साठी भीमा परिवाराने संपूर्ण तयारी केली असल्याचे सुद्धा खात्रीलायक वृत्त आमच्या हाती आले आहे.

या शासन आदेशामध्ये असे म्हटले आहे की या सर्व निवडणुका covid-19 चे सर्व नियम पाळून घेण्यात याव्यात असा आदेश १)सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे,२) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण ऑफिस पुणे,३) विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे,४) निवड वस्ती सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालय यांना हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे असे यामध्ये म्हटले आह.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget