सोलापूर // प्रतिनिधी
आज दि. 02 फेब्रुवारी 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे पूर्व विभागातील नागरीकांच्या सोयीकरीता 2 नं. बसस्टॅन्ड (शास्त्री नगर) येथून लांब पल्याच्या एस.टी. बसगाड्यांची सोय करण्यात आली याचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दत्तात्रय चिकुर्डे विभागीय नियंत्रक, विलास राठोड, दत्तात्रय कुलकर्णी आगार प्रमुख, नगरसेवक प्रविण निकाळजे, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, नगरसेविका अनुराधा काटकर, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, मल्लिकार्जुन कमटम, तिरुपती परकीपंडला, उपेंद्र ठाकर, आदि. उपस्थित होते.
सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत 2 बसस्थानक असून शास्त्री नगर परिसरातील 2 नं. बसस्थानक सद्यस्थितीत बंद अवस्थेत होते. यामुळे सदर भागातील नागरीकांना प्रवास करण्याकरीता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच 2 नं. बसस्थापकामध्ये आंध्र, कर्नाटकच्या बसेसचा थांबा सुरु केल्यास सदर भागामधील युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी 2 नं. बस स्टॅन्ड (शास्त्री नगर) येथून लांब पल्याच्या एस.टी. बसगाड्या सुरु होण्याकरीता सतत पाठपूरावा सुरु केला, यामुळे सदर शास्त्री नगर येथे एस.टी. बसगाड्या सुरु करून त्याचे शुभारंभ आज करण्यात आले. यावेळी जय मुदगुंडी, विक्रम बंदपट्टे, सिद्राम चव्हाण, विवेक कंन्ना, संजय गायकवाड़, योगेश मार्गम, श्रीधर काटकर, दाऊद नदाफ, शाहु सलगर, प्रभाकर भीमनाथ, राघवेंद्र आडकी, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, मोनिका सरकार, तिपन्ना गणेरी, प्रकाश आसादे, हनमंतु श्रीराम, राजेन्द्र शिरकुल, चक्रपाणी गज्ज्म, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, महेश कुंभार, व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.