सिताराम महाराज साखर कारखान्याने एप आर पी चे ऊसाचे बील द्यावे, जनहित शेतकरी संघटनेची मागणी




पंढरपूर // प्रतिनिधी  

पंढरपूर तालुक्यातील सिताराम महाराज साखर कारखान्याचे सन २०१८~१९ मधील गाळपास आलेल्या शेतकर्याच्या ऊस बिलाचे पैसे कारखान्याने अद्याप जमा केले नसल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे,असून गेली दोन वर्षं झाली शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात संघर्ष बघताना दिसत आहे.

शेतकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर १५००देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम कारखाना प्रशासनाने केले आहे,उर्वरित पैसे मिळवण्यासाठी शेतकरी हतबल झाला आहे,

     एका बाजूला शुगर अॅक्ट कायदा सांगतो की शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्या नंतर १५ दिवसांच्या आत एप आर पी रक्कम शेतकर्याच्या खात्यावर जमा करावी असा कायदा असताना ह्या कायद्याची अंमलबजावणी सिताराम महाराज साखर कारखान्याने केली नसल्यामुळे हा कायदा पायदळी तुडवला आहे.

      पंढरपूर तालुक्यातील शेतकरी कोरोना,आणि लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडला आहे,गेली दोन वर्षा पूर्वी गेलेल्या व शेतकर्याने जीवापाड जपलेल्या ऊसाचे ऊस बील त्यांचे घामाचे दाम मिळण्यासाठी शेतकरयांना मिळवण्यासाठी पार मोठी कसरत करावी लागत आहे.

         आज पंढरपूर प्रांत आॅफीस मध्ये जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले, यावेळी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे, तालुकाध्यक्ष सचिन आटकळे, ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी श्नी औदुंबर गायकवाड, महादेव गायकवाड,प्रकाश तनपुरे, सुधीर देशमुख आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget