सौ.चित्राताई वाघ यांच्यावर पोस्ट करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी: विक्रम शिरसट




पंढरपूर // प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांची सोशल मीडियावरून काही अज्ञात व्यक्तींकडून बदनामी करणाऱ्या पोस्ट प्रसिद्ध केल्या होत्या.



सौ.चित्राताई वाघ ह्या सर्व गोरगरीब व गरजू माता-भगिनी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सतत ठाम भूमिका मांडत असतात. कदाचित याच कारणाने त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने काही लोक पोस्ट करीत आहे अशा प्रवृत्ती खेदजनक आहेत तरी सदर बदनामी करणाऱ्या व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेऊन तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे याबाबतीत विलंब झाल्यास भारतीय जनता पार्टी पंढरपुर यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी या निवेदनातून देण्यात आला आहे.


यावेळी जिल्हा सरचिटणीस बादलसिंह ठाकुर,भाजपा नपा गटनेता अनिल अभंगराव,अध्यक्षा पंढरपुर शहर भाजपा शकुंतला नडगिरे,शहर उपाध्यक्ष सौ.रेखा कुलकर्णी,सौ.अपर्ना तारके, आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget