भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांच्या पतीवर गुन्हा दाखल!

 



(बेहिशोबी मालमत्ता प्रकरण)


वृत्तसंस्था // प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकासआघाडी सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी रुग्णालयात कार्यरत होते. 2016 मध्ये चार लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी किशोर वाघ यांना अटक झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती.

त्यामध्ये किशोर वाघ यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे किशोर वाघ दोषी असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर किशोर वाघ यांच्यावर निलंबन वगळता इतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget