पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी भरणे मामा यांचे मोठे विधान!





सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे हे ठरवणार असून, ते जे निर्णय घेतील तो उमेदवार फायनल असेल. दिवंगत भारत भालके यांचे या मतदारसंघात फार मोठे काम असल्यामुळे तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी होण्यास अडचण निर्माण होणार नाही. शेवटी महाविकास आघाडीचे सरकार आहे, असा विश्‍वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. 


नगरपालिकेच्या वतीने शहरात केलेल्या बगीचा सुशोभीकरण, गॅस शवदाहिनी, उद्योग प्रशिक्षण इमारत, प्रस्तावित शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अभ्यासिका आदींसह विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री भरणे मंगळवेढा येथे आले होते. त्या वेळी साठेनगर येथील कामाची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. 


त्यांच्या समवेत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे लतीफ तांबोळी, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, प्रवीण खवतोडे, विजय खवतोडे, संकेत खटके, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, सोमनाथ माळी, सचिन शिंदे, भागीरथी नागणे, अनिल बोदाडे, चंद्रकांत पडवळे, राहुल सावंजी, बशीर बागवान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजम्मिल काझी, भारत बेदरे, ऍड. शिवानंद पाटील, बसवराज पाटील, गुलाब थोरबोले आदी उपस्थित होते. 


दिवंगत भारत भालके यांनी मंगळवेढा शहर विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माझ्याकडे अनेक वेळा मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यांनी मागणी केलेल्या सर्व प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही. नगरपालिकेने विकासकामांच्या संदर्भात ज्या प्रस्तावांची मागणी केली आहे त्याला राज्य सरकारबरोबरच जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देणार आहे, असे आश्‍वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget