सोलापूर // प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर कुंभारी येथील स्व . मिनाताई ठाकरे विडी कामगार घरकुल वसाहतीत नागरी सुविधा आणि मुलभूत लवकरच पुरविण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता ( मामा ) भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले .
माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण घरकुल वसाहतीत लाभार्थी विडी कामगारांना सन २००५ व २०१० साली ताबा देण्यात आले . म्हणजेच १५ ते १६ वर्षापासून रहिवासियांना नागरीसुविधा व मुलभूत गरजांचा समस्या निर्माण झाली आहे . याबाबत संस्थेचे संस्थापक विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी वारंवार सरकारकडे व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करीत होते . आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या समस्या सोडवावे म्हणून मुख्यमंत्री मा . उध्दवजी ठाकरे साहेब व संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे . म्हणुन दि . १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मा . जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री दत्ता ( मामा ) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आणि इतर प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत वेटकीचे आयोजन करण्यात आले . यावेळी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी माँ साहेब घरकुल वसाहतीतील समस्या अत्यंत पोट तिडकीने मांडले यात पाणी , रस्ता , ड्रेनेज , विड्यांचे पानाचे घन कचरा लाईट आणि इतर समस्यांच्या माहिती दिली . त्यानंतर मा . पालकमंत्री श्री . दत्ता ( मामा ) भरणे यांनी मा . जिल्हाधिकारी शंभरकर साहेब , मुख्यकार्यकारी अधिकारी स्वामी साहेब , निवासी जिल्हाधिकारी वाघमारे साहेब , सर्व विभागातील अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना याबाबत तातडीचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आणि या समस्या मा . मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याशी संयुक्त बैठक घेण्यात येईल असेही आश्वासन दिले . या बैठकीत विष्णु कारमपुरी ( महाराज ) , श्रीनिवास चिलवेरी , दशरथ नंदाल , विठ्ठल कु - हाडकर , प्रशांत जक्का, शिवानंद येरटे, कॉ . आडम मास्तर , नगरसेविका कामिनी आडम उपस्थित होते .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.