सोलापूर // प्रतिनिधी
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील काजल माळी या विद्यार्थिनीला एएमडॉक्स या नामांकित कंपनीमध्ये ४ लाखाचे पॅकेज मिळाले आहे. पुणे येथील एएमडॉक्स या कंपनीमध्ये फंक्शनल टेस्ट इंजिनीअर म्हणून निवड झाली आहे. सदर विद्यार्थिनीने ‘क्यू स्पायडर’ या नामांकित कंपनीमध्ये फॅबटेककडून प्लेसमेंट होऊन दोन महिन्याचे मोफत ट्रैनिंग घेतले होते.या विद्यार्थिनींची निवड ‘क्यू स्पायडर’ कडून झाल्याची माहिती ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडार यांनी दिली आहे.
‘क्यू स्पायडर’ हि अत्यंत चांगली सर्व्हिस देण्याचे काम करीत आहे. मागील तीन वर्षांपासून हि कंपनी विद्यार्थ्यांना चांगला जॉब मिळवून देत आहे आतापर्यंत जे कोणी विद्यार्थी या कंपनीमध्ये निवडली गेली आहेत या सर्वांना कमीत कमी ३.५ लाखाचे पॅकेज मिळाले आहे असे उद्गार अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे यांनी काढले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी अभिनंदन केले. यावेळी, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा तसेच कॉम्पुटर विभाचे विभाग प्रमुख प्रा. पराग दौन्डे आदी उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.