दोन तरुणींनी श्रींची पालखी शेगाव पर्यंत आपल्या खांद्यावर नेल्या मुळे होत आहे सर्वत्र कौतुक




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान च्या माध्यमातून महा क्षेत्र शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले होते व या दिंडी सोहळा ला परिसरातून वर्षानुवर्ष भरपूर प्रतिसाद मिळत आहे यावर्षी शासनाच्या नियम अटी चे पालन करून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान दि 13 तारखेला करण्यात आले व लांबून , लांबून भक्तगण मंडळी या दिंडी सोहळा मध्ये सहभागी झाली पण यावर्षी दिंडी सोहळ्यात वेगळेपण दिसून आले ते म्हणजे कुमारी वैष्णवी बुरघाटे व कुमारी पुजा बुरघाटे या दोन तरुणींनी श्रींची 50 किलो ची पालखी योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका ते महा क्षेत्र शेगाव पर्यंत तब्बल साठ किलोमीटर अंतर ही पालखी आपल्या खांद्यावर घेतल्यामुळे सर्व स्तरावर या तरुणींचे कौतुक होत आहे. दिंडी सोहळ्यात संजय भाऊ खंडार पाटसुल,संतोष गाडेकर रौंदळा, गजानन महाराज गृप आडसुळ,राजु भाऊ वैराळे निंबा फाटा,बडे भाऊ शेगाव या दानशूर व्यक्तींनी वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था केली दिंडी मध्ये विनेकरी अवारे महाराज गायनाचार्य  विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे,प्रविन महाराज कुलट, विलास महाराज कराड,अमोल महाराज कुलट, गोपाल महाराज नारे,श्रीधर महाराज तळोकार,ज्ञानेश्वरी दीदी शेटे,पुरष्षौत्तम महाराज रौराळे , गजानन मोडक,मोहन काळे हि गुणीजन मंडळी उपस्थितीत होती शेगाव येथे गणेश महाराज शेटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने दिंडीचा समारोप करण्यात आला यावेळी भानुदास पा बुरघाटे, सुभाष पाटील बुरघाटे बबनराव पाटील खरड,बबन पा सपकाळ प्रदीप पाटील बुरघाटे,अरुण पाटील बुरघाटे, राजेश बुरघाटे या वारकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य मिळाले अशी माहिती दिंडी चालक गणेश महाराज शेटे यांनी दिली

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget