सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाची सरशी




एकूण ५३ पैकी तब्बल ३१ गावांमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच.


सोलापूर // प्रतिनिधी 

सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने बाजी मारली आहे. कागल तालुक्यात एकूण ५३ सरपंच निवडी झाल्या, त्यापैकी तब्बल ३१  ग्रामपंचायतींवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या सरपंचांच्या निवडी झाल्या. शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाचे नऊ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाले. शिवसेनेच्याच खासदार प्रा. संजय मंडलिक गटाचे एकूण सहा सरपंच झाले. भाजपच्या सरपंचांमध्ये समरजितसिंह घाटगे गटाचे पाच, रणजितसिंह पाटील गटाचा व बाबासाहेब पाटील गटाचा प्रत्येकी एक अशा निवडी झाल्या.



              मंत्री श्री. मुश्रीफ गटाच्या निवड झालेल्या ३१  गावांमध्ये सुळकुड, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, शंकरवाडी, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, केनवडे, पिंपळगाव बुद्रुक, मळगे खुर्द, मळगे बुद्रुक, केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, बिद्री, उंदरवाडी, अर्जुनी, लिंगनूर कापशी, खडकेवाडा, नानीबाई चिखली, कौलगे, माद्याळ, वडगाव, तमनाकवाडा, आलाबाद, कासारी, मागनूर, बेलेवाडी मासा, बोळावीवाडी, करंजीवणे या गावांचा समावेश आहे.

               शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सरपंच झालेल्या नऊ गावांमध्ये शेंडूर, गोरंबे, म्हाकवे, बानगे, साके, भडगाव, सोनगे, यमगे, हसुर खुर्द या गावांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्याच खासदार संजय मंडलिक गटाचे सरपंच झालेल्या सहा गावांमध्ये बस्तवडे, सोनाळी, गलगले, कुरुकली, हळदी, मेतके या गावांचा समावेश आहे.

          भाजपचे सरपंच झालेल्या गावांमध्ये समरजीत घाटगे गटाचे सरपंच झालेल्या एकोंडी, कुरणी, सावर्डे बुद्रुक, शिंदेवाडी व बेनिक्रे या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. भाजपच्याच रणजीतसिंह पाटील गटाचा हळदवडे येथे व याच पक्षाच्या बाबासाहेब पाटील गटाचा वाळवे खुर्द येथील सरपंच झाला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget